Tuesday, July 2, 2013

भाऊ पाध्ये : नवीन आवृत्त्या

भाऊ पाध्यांची सगळ्या पुस्तकांच्या नव्या आवृत्त्या 'शब्द पब्लिकेशन' काढणार आहे, अशी जाहिरात पूर्वीच आली होती. जाहिरातीवेळी 'राडा'ची नवीन आवृत्ती बाजारात आली होती. आत्ताच्या मे महिन्यात. 'करंटा', 'अग्रेसर' आणि 'वासूनाका' यांच्या नव्या आवृत्त्याही बाजारात आलेल्या आहेत. 'वासूनाका'च्या तरी आवृत्त्या निघाल्या होत्या, पण 'करंटा' आणि 'अग्रेसर' यांच्या पहिल्या आवृत्त्या अनुक्रमे १९६१ (मॅजेस्टिक बुक स्टॉल) आणि १९६९ (जी. एम. प्रभू, गोवा) अशा निघाल्या होत्या. त्यानंतर या कादंबऱ्या गेली कित्येक वर्षं बाजारात नव्हत्या. या दोन कादंबऱ्यांच्या नवीन आवृत्त्याही आता वाचकांना उपलब्ध होतायंत. या तीनही पुस्तकांची मुखपृष्ठं बाळ ठाकूर यांनी केलेली आहेत.



No comments:

Post a Comment